‘पुण्यातच चोपायला पाहिजे होता’, शर्जील उस्मानीवर राज ठाकरे रोखठोक

मुंबई | पुण्यात ३० जानेवारीला एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या शर्जील उस्मानीने हिंदू समाजाविषयी वादग्रस्त भाषण दिले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. रोखठोख मतं मांडत त्यांनी ‘शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं’ असं म्हटले आहे.

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. ते स्वत: न्यायालयात हजर राहिले होते. यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं. अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपले मत मांडेल आहे.

काय म्हणाला होता शर्जील?
‘आज हिंदुस्थानमधील हिंदू समाज सडलेला आहे. आता कोणत्याही कारणांची गरज वाटत नाही, मुसलमान आहात मारून टाकतील, गोष खाताय मग ते बकरी, चिकन, बीफ आहे, काही फरक पडत नाही मारून टाकतील. रेल्वेने प्रवास करताय, बसलाय सीट मागितली म्हणून मारतील, सीट दिली तरी मारतील. दोन हजार रुपयांच्या बछड्याची चोरी झाली की माणसांचा जीव घेतला’. असे शार्जीलने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘हिंदू समाज सडलेला आहे’, एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीचे वादग्रस्त वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल
‘शर्जील उस्मानीच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणा’, फडणवीसांचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम
‘कोण कुठली रिहाना? का तिला इतकं महत्व दिलं जातय?’
भाजपला धक्का! ‘या’ बड्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.