Share

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी, राज ठाकरेंकडून युतीच्या टाळीसाठी हात पुढे, स्पष्टच म्हणाले…

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी त्यांच्या चुलत भावासोबत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) भविष्यातील युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि त्यांचे जिवलग मित्र महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे आमच्यातील वाद अत्यंत शुल्लक आहेत.”

“वादांपेक्षा महाराष्ट्र मोठा, युती शक्य”

महेश मांजरेकरांनी मुलाखतीदरम्यान थेट प्रश्न विचारला की, *“शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र येणं शक्य आहे का?”*
यावर राज ठाकरे म्हणाले:

“महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भवितव्यासाठी आमच्यातील वाद, भांडणं फार किरकोळ आहेत. त्यामुळे एकत्र येणं किंवा राहणं यात मला काही अडचण वाटत नाही.” तसेच त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “ही बाब केवळ माझ्या इच्छेची किंवा स्वार्थाची नाही. या गोष्टीकडे मोठ्या दृष्टीकोनातून पाहणं गरजेचं आहे.”

मराठी पक्षासाठी मोठं आवाहन

राज ठाकरे यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाचं मत मांडलं —
“महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमधील मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष निर्माण केला पाहिजे. मराठी अस्मिता आणि राज्याच्या भविष्यासाठी ही एकजूट गरजेची आहे.”

संभाव्य युतीची शक्यता?

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याशी पुन्हा युती होणार का, यावर चर्चेचं केंद्रबिंदू बनलं आहे. दोघांमधील वर्षानुवर्षांचे मतभेद, विभाजन आणि टोकाच्या भूमिका असूनही, *”लार्जर पिक्चर”* चा हवाला देत राज ठाकरे यांनी युतीसाठी दरवाजे उघडे असल्याचे स्पष्ट केले आहे.

थोडक्यात, राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मराठी राजकारणात मोठे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात उद्धव-राज पुन्हा एकत्र येतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
raj-thackerays-big-statement-regarding-uddhav-thackerays-future-alliance

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now