Raj Thackeray and Uddhav Thackeray: (Mahayuti) गोटात खळबळ उडाली आहे. मराठी माणसांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकच वाढू नये, म्हणूनच भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट (Ajit Pawar faction) यांनी ‘नो रिस्क’ धोरण स्वीकारत ठाकरे बंधूंविरोधात आघाडी तयार केली आहे.
एकत्र निवडणुकीचा निर्णय
महानगरपालिकांमध्ये विशेषतः मुंबईत जर भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र लढत दिली, तर मतांचं विभाजन होऊन ठाकरे बंधूंना फायदा होण्याची शक्यता होती. म्हणूनच तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत प्रत्येक वॉर्डाची जबाबदारी स्थानिक आमदारांकडे सोपवली जाणार असून, ते जनतेपर्यंत महायुतीचं काम पोहोचवणार आहेत.
महायुद्धासाठी गणेशोत्सवाचं हत्यार
मुंबईतील कोकणी, हिंदी आणि मुस्लिम पट्ट्यांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी भाजपने खास गणेशोत्सव योजना आखली आहे. गणपतीच्या काळात मोफत एसटी आणि लोकल सेवा देणं, गोविंदा पथकं आणि सार्वजनिक गणेश मंडळांना जोडून मतं मिळवणं हा भाग यामध्ये समाविष्ट आहे. मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी हे पर्व भाजपसाठी ‘मोबिलायझेशन’ टूल ठरणार आहे.
‘ब्रँड ठाकरे’ला आव्हान द्यायचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक भाजप आमदारांनी ही शक्यता नाकारली असली, तरी मुंबईतील मराठी मतदारांच्या मनात ठाकरे बंधूंविषयी असलेली आस्था लक्षात घेता, भाजपनं सावध पवित्रा घेतला आहे. ‘ब्रँड ठाकरे’चा प्रभाव रोखण्यासाठी शिवसेनेतील (Shiv Sena) आणि मनसेतील (MNS) असंतुष्ट नेत्यांना भाजपकडे वळवण्याचा, त्यांचं मतांमध्ये विभाजन घडवण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
ठाकरे बंधूंच्या सत्ताकाळातील निर्णय, निधी वाटप आणि विकासकामांबाबत जनतेसमोर माहिती मांडण्याची मोहीम महायुती राबवणार आहे. सणासुदीच्या काळात मतदारांशी संवाद साधून पालिका निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळवण्याचा महायुतीचा निर्धार आहे.