Raj Thackeray-Uddhav Thackeray: हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आणि मराठी भाषेच्या हक्कासाठी राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघंही 5 जुलै रोजी मराठीसाठी संयुक्त मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा हिंदी भाषेच्या वाढत्या सक्तीविरोधात आणि राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील त्रिभाषा सूत्राविरोधात असेल.
एकत्र मोर्चासाठी हालचालींना वेग
या मोर्चासाठी सुरुवातीला वेगळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मोर्चा 5 जुलै रोजी तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मोर्चा 7 जुलै रोजी होणार होता. परंतु दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवी संघटनांनी एकत्रितपणे मोर्चा काढावा अशी मागणी केली होती. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावरून जाहीर करत सांगितले की, “महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा काढण्यात येणार आहे.”
At dawn from the gateway to Mars, the launch of Starship’s second flight test pic.twitter.com/ffKnsVKwG4
— SpaceX (@SpaceX) December 7, 2023
मनसे नेते संदीप देशपांडे यांचा विश्वास
मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मराठी माणसाची एकत्र ताकद दाखवणं आता अत्यंत गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी दिलेलं आवाहन सकारात्मक प्रतिसादासह स्वीकारण्यात आलं आहे. मराठी भाषेवर जो अन्याय होतो आहे, त्याविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणे हे मराठी जनतेचं कर्तव्य आहे.”
काय म्हणाले अरविंद सावंत ?
शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितले की, “एप्रिल महिन्यात (19 April) झालेल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी माझा अहंकार बाजूला ठेवतो कारण महाराष्ट्र माझ्यासाठी सर्वोच्च आहे. त्याचंच प्रतिबिंब या एकत्रित मोर्चातून दिसून येतंय.” ते पुढे म्हणाले, “मराठीसाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रद्रोही शक्तींनी या मोर्चाला रोखण्याचे अनेक प्रयत्न केले, पण अखेर मराठी एकजूट उभी राहतेय.”
रोहित पवार यांचं स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Sharad Pawar Group – NCP-SP) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या निर्णयाचं स्वागत करत म्हटलं, “मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंददायी क्षण आहे. हे बघून महाराष्ट्रविरोधकांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. मोर्चा निघण्याआधीच सरकारला नमते घ्यावे लागेल.”
सामनाच्या पहिल्या पानावर ऐतिहासिक मांडणी
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ (Saamana) या दैनिकात आज (27 जून) पहिल्याच पानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे फोटो एकत्र छापण्यात आले. “राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला,” या शीर्षकाखाली सामनाने त्यांच्या एकत्रित भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधातील आंदोलनाची माहिती उद्धव ठाकरे यांच्या बाजूला राज ठाकरे यांच्या भूमिकेची छायाचित्रांसह दिली आहे.