Share

Raj Thackeray-Uddhav Thackeray : ५ जुलैच्या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी; गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ दहिहंडी पथकांना केलं खास आवाहन

Raj Thackeray, Uddhav Thackeray

Raj Thackeray-Uddhav Thackeray : त्रिभाषा धोरणाला विरोध करत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. ५ जुलै २०२५ रोजी गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) ते आझाद मैदान (Azad Maidan) असा विराट मोर्चा निघणार आहे.

या मोर्चात कोणताही राजकीय झेंडा नसेल, मराठीचा अजेंडा असेल, असं स्पष्ट करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं की, “या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे.” त्यांनी साहित्यिक, कलाकार, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि सर्वसामान्य जनतेला मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं आहे.

मनसेकडून मंडळांशी थेट संपर्क

मोर्चात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळवण्यासाठी मनसे (MNS) कडून दहीहंडी पथक, गणेशोत्सव मंडळ, आणि नवरात्री उत्सव मंडळ यांच्याशी संवाद सुरू केला आहे. या मंडळांना मोर्चात सहभागी होण्याची विनंती करण्यात येत आहे.

आज (२५ जून )संध्याकाळी विभागनिहाय बैठकांचे आयोजन मुंबई (Mumbai) शहरात करण्यात आलं आहे. यामध्ये संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या नेतृत्वात वरळी (Worli) येथेही मंडळांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात समन्वय

मोर्चाच्या नियोजनासाठी दोन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. काल संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी वरुण सरदेसाई (Varun Sardesai) – आमदार, शिवसेना (ठाकरे गट) (ShivSena) यांची भेट घेतली. त्यानंतर ते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबतही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – Sharad Pawar group) कडूनही समर्थन मिळालं आहे.

मोर्चाचा मार्ग व वेळ

  • दिनांक: ५ जुलै २०२५

  • मार्ग: गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) ते आझाद मैदान (Azad Maidan)

  • ठिकाण: दक्षिण मुंबई (South Mumbai)

  • वेळ: लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now