Share

Raj Thackeray-Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंची युती पक्की; मुंबईसह सहा महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार, पाहा A ते Z माहिती

Raj Thackeray-Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थ (Shivteerth) निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील सहा महापालिकांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक रणनिती, जागा वाटप, उमेदवारांचा समन्वय आणि मराठीबहुल प्रभागांवर लक्ष देण्याचे मुद्दे तपशीलवार हाताळले.

राज ठाकरे यांच्या मनसे (MNS) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) मध्ये सहा महापालिका निवडणुकांसाठी युती निश्चित झाली आहे. यामध्ये मुंबई महापालिका, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिका यांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे (Rajan Vichare) आणि मनसेकडून अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जागा वाटपाची जबाबदारी दिली गेली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) आणि शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी आहे.

दोन्ही पक्ष मराठीबहुल प्रभागांमध्ये विशेष लक्ष देत आहेत. मनसेकडून विद्यमान नगरसेवक असलेल्या 20-25 जागा मागितल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटात गेले असल्याने त्यांची जागा देखील मनसेकडे जाण्याची शक्यता आहे. दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या भागांसाठी जागा वाटपावर दोन्ही पक्षांमध्ये अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अजून काही फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी संभाव्य जागांवर सखोल चर्चा होत असून, ठाकरे बंधू प्रत्येक प्रभागाची ताकद, उमेदवार आणि मतदारांची अपेक्षा तपासूनच अंतिम निर्णय घेणार आहेत. या युतीमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची ताकद मराठीबहुल भागांत अधिक दृढ होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now