नुकताच अशोक सराफ यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यांनी सोहळ्यादरम्यान अशोक सराफ यांचं तोंडभरून कौतुक केलं. राज ठाकरे म्हणाले की, असा दागिना सराफांच्या घरीच सापडतो. पुण्यामध्ये ते बोलत होते.
अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अशोकपर्व हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले की, अशोक सराफ यांच्या अभिनयाची जादू अजूनही कायम आहे.
हा देश चुकीच्या मार्गाला गेला नाही याचे कारण अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार आहेत. यांच्यासारख्या कलाकारांचे विचार खूप महत्वाचे आहेत. हा असा दागिणा सराफांच्याच घरीच सापडतो. पुढे अशोक सराफ यांचे तोंडभरून कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले की, परदेशात विमानतळांना कलाकारांची नावं आहेत.
आमच्याकडे कलाकारांच्या नावाने चौक आहेत. मात्र त्यांच्या प्रतिमा जपल्या जात नाहीत. त्यामुळे कलाकारांचे महत्व काय आहे हे परदेशात गेल्याशिवाय कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी अशोक मामांबद्दल बोलताना एक गमतीशीर वक्तव्य केलं.
पुढं राज ठाकरे म्हणाले की, मला आज आज कळलं की अशोक सराफ तुमचं मुळ गाव कर्नाटकात आहे. मला असं वाटलं तुम्हीच कर्नाटक सीमावाद सोडवलात. अशोक सरांचा सत्कार माझ्या हातून हे मोठं भाग्य आहे. खरं तर अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर ते आज मुख्यमंत्री असते, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान अशोक सराफ यांनी आयोजकांचे आभार मानले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडून माझा सत्कार होणे हे मी माझं भाग्य समजतो. राज ठाकरे हा माझा अतिशय आवडता माणूस आहे. ते अतिशय ब्रिलीयंट व्यक्ती आहेत. कोणत्याही मुद्द्यावर बोलताना ते संपुर्ण अभ्यास केल्याशिवाय कधीच बोलत नाहीत त्यामुळे असा अभ्यास करणारी लोकं फार कमी आहेत. एक व्यक्ती म्हणून मला ते भावतात, असं अशोक सराफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
ved : रितेशच्या वेडला लोकांचा तुफान प्रतिसाद, ९ व्या दिवशीच्या कमाईचा आकडा पाहून बसेल धक्का
फक्त १० हजार देऊन पत्राचे शेड भाड्याने घेतले अन् कमावले तब्बल ४०० कोटी, कारनामा बघून पोलिसही हादरले
पतीचा अपघाती मृत्यु, दोन मुलांचा आक्रोश, शोकातून पत्नीनं केलं असं काही.., वाचून हादराल
BJP : भाजपमध्ये महीला सेफ नाहीत म्हणत महीला नेत्याने दिला राजीनामा; उर्फी चित्रा वाघांना डिवचत म्हणाली आता..