सरकारच्या सांगण्यावरूनच लता मंगेशकर व सचिन तेंडूलकरने ट्विट केले; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया येत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले होते.

आपण याबद्दल का बोलत नाही आहोत? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. त्यानंतर ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांच्यासह अनेकांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट भूमिका मांडतं. प्रश्नांची माहिती करून घेण्याचा सल्ला दिला होता.

यात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होते. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, ‘सरकारने भारतरत्नांना अशाप्रकारे ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे. एखाद्या सरकारी धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही कर्तृत्ववान माणसं आहेत पण साधी माणसं आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्विट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय.’

महत्त्वाच्या बातम्या
कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचारी बेपत्ता; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप
हे आंदोलन थांबवण्यासाठी आता तुम्हीच पुढे या; मोदी सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्यांना पवारांचे आवाहन
राज ठाकरेंनी सांगितला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढायचा मार्ग…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.