जेव्हा राज ठाकरेंनी १०-१२ वेळा फोन करूनही निलेश साबळेने फोन नाही उचलला, कारण…

 

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेमधल्या प्रत्येक कलाकाराने आपली फक्त महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण देशभरात एक वेगळी निर्माण केली आहे. तसेच सर्व कलाकार तळागाळातुन आलेले आहे, हे सर्वांना माहित आहेत.

कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असे म्हणणारा या कार्यक्रमातील अँकर निलेश साबळे आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे.

या कार्यक्रमाचे मोठमोठे नेतेही चाहते आहे, यातले विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. एक दिवशी राज ठाकरेंनी निलेश साबळेला फोन लावला होता, चला तर मग जाणून घेऊया तेव्हा नेमकं काय झालं होतं.

चला हवा येऊ द्याची शुटींगला रात्र होते, त्यानंतर त्याची एडीटींग होते, यासर्व गोष्टींना ५ वाजतात. निलेशला या कामामुळे रात्री झोपायलाही बराच उशीर होतो. त्यामुळे निलेश झोपायला प्राधान्य देत असल्याने उठायलाही उशीर होत असे. एक दिवशी सकाळी निलेश झोपेत असताना त्याला राज ठाकरेंचा फोन आला.

अनोळखी नंबर दिसत असल्याने निलेशने फोनकडे दुर्लक्ष केले. पण सलग त्याला फोन येत होते, सलग १० ते १२ फोन आले होते, अजूनही फोन येणे सुरुच होते. त्यामुळे शेवटी त्याने फोन उचलाच.

हॅलो मी राज ठाकरे बोलतोय, मला तुमचा चला हवा येऊ द्या कार्यक्रम खुप आवडतो. तुमचे अनेक चाहते असतील त्या चाहत्यांमधलाच मी एक आहे. मी रोज तुमचे एपिसोड बघतो. मला तुमच्या सर्व टीमला भेटण्याची इच्छा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. हे सर्व ऐकूण निलेशला विश्वासच बसेना.

निलेशला वाटले कोणीतरी राज ठाकरेंच्या आवाजाची नक्कल करुन फसवण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरेंना मला फोन करण्याचे काय कारण असू शकते. त्यामुळे निलेशने एवढे गांभीर्याने घेतले नाही

पुढे राज ठाकरे म्हणाले, तुमची कॉमेडी मला प्रचंड आवडते. सर्व कॉमेडी शो पाहतो, त्यात विदेशी शोही असतात, पण तुमच्या कॉमेडीमध्ये एक वेगळेपणा जाणवतो. तुम्हाला अजूनही मी राज ठाकरे बोलतोय हे खरे नाही वाटत आहे का? असे म्हणत राज ठाकरेंनी काही लोकांचे संदर्भ दिले, तेव्हा निलेशला विश्वास बसला आणि तो सॉरी म्हणाला आणि भेट घेण्याचे ठरवले.

निलेशने हे सर्व त्याच्या टीमला सांगितले, टीमनेही राज ठाकरेंना भेटण्यास आनंदाने होकार दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी जेव्हा त्या सर्वांची भेट घेतली, तेव्हा ते चार-पाच तास त्यांच्याशी बोलले. त्यांनी व्यंगचित्र, विनोदी लिखाण, तसेच कला या सर्व विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. अशा प्रकारचा हा किस्सा होता. या किस्सावरुन राज ठाकरेंचे कलेवरचे प्रेम स्पष्ट दिसून येते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.