राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर देखील आमदार राजू पाटील त्या आंदोलनात होणार सहभागी

मुंबई । सध्या मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद पेटला आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल असे शिवसेनेने सांगितले आहे. असे असताना विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी २४ जून रोजी स्थानिक भूमिपुत्र सिडको भवनाला घेराव घालणार आहेत.

अनेक पक्षाचे नेते यात सहभागी होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असे म्हटले होते. मात्र तरीही भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रह कायम ठेवत आंदोलनाची ठाम भूमिका घेतली.

परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंदोलनात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे.

अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे समाजाच्या या आंदोलनात त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझे पहिले प्राधान्य आहे.

यामुळे ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडले, त्यांचा निषेध करण्यासाठी लढणार आहे. आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत असे आमदार राजू पाटील म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

वयाच्या ७३ व्या वर्षी राखी गुलजार करतात ‘हे’ काम, त्यांना ओळखणेही झाले कठीण….

‘या’ पदार्थांमुळे रोग प्रतिकारशक्ती होते कमी; आजच बंद करा हे पदार्थ खाणं

काँग्रेसच्या सरकारमुळेच भारतातील पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.