Share

राज ठाकरे पुण्यातून निघताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यालयातच भिडले नेते

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील नदीपात्रात २१ मे रोजी जाहीर सभा होणार होती. पण ही सभा रद्द झाली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष ही सभा रद्द होताच तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे पुण्यातून मुंबईला रवाना झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.(Raj Thackeray left Pune mns politician fight)

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे पक्षाच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात हा गोंधळ झाला आहे. काल रात्री मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष रणजित शिरोळे आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी रणजित शिरोळे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. यामुळे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षातील पुण्यातील पदाधिकारी एकमेकांवर नाराज असल्याचे सांगितले जात होते. यादरम्यान काल मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष रणजित शिरोळे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शैलेश टिळेकर यांच्यात वाद झाला. पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात काल मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.

यावेळी पक्षाच्या बैठकींना बोलावलं जात नाही, यावरून विटकर यांनी रणजित शिरोळेयांना जाब विचारला. यावरून मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष रणजित शिरोळे भडकले. यानंतर दोघांमध्ये हमरी-तुमरी झाली. यावरून दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वाद झाला. यावेळी मनसेचे पुणे शहर अध्यक्ष देखील उपस्थित होते.

सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमारे ५० हजारांच्या पुस्तकांची खरेदी केली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात फिरताना दिसले होते. यावेळी माध्यमांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले होते.

“आम्हाला जगू देणार का नाही?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील कार्यक्रमांबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण आता सभा रद्द झाल्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राजेशाही थाटात पार पडला PSI पल्लवी जाधवचा विवाह सोहळा, जाणून घ्या तिची संघर्षकथा..
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणला मोदींनी आवरावे अन्यथा…आता निर्वाणीचा इशारा
‘पवारांनी संस्कृतीवर बोलू नये, तुमची शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल’; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now