“राज ठाकरे म्हणजे राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव राजा माणूस”

राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

आता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकराकडून सोमवारी घेण्यात आला आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरु आहे. केंद्राने राज्ये, खाजगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मात्यांकडून लस खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्य सरकारकडून स्वागत करण्यात आले आहे. असे असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतूक केले आहे.

राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड माराके नाही, असे ट्विट करत केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतूक केले आहे.

तसेच राज ठाकरे यांना केदार शिंदे यांनी राजा म्हणूनही संबोधले आहे. या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा, असेही केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांना म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल, तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी गरजेची आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण करण्यात यावे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले होते.

तसेच राज्यातील खाजगी संस्थानांही लसी खरेदी करता याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. ती मागणी मान्य झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आभार मानले होते.

महत्वाच्या बातम्या-

बाॅक्सरचा तो व्हिडीओ पाहून महींद्रा झाले फिदा; केली स्टार्टअपसाठी मदत करण्याची घोषणा
सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?
दिलासादायक! आता राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढणार नाही, तज्ञांनी सांगितले कारण, जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.