Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिवसेनेच्या वादात अनेकदा मनसे नेतेही आपल्या प्रतिक्रिया देत असतात. कधीकधी मनसेकडून टीकाही करण्यात येत असतात. मात्र, यावेळी मनसे नेत्यांनी यापासून लांब राहण्याचा सल्ला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिला आहे. यावरून ते प्रचंड ट्रोल होत आहेत.
नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. “सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन,” असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2022
मात्र, आता या ट्विटमुळे ते प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण त्यांच्या ट्विटला समर्थन देत आहेत तर अनेकजण विरोधही करत आहेत. त्यांच्या ट्विटवर कमेंट करत राज ठाकरेंना ट्रोल केले जात आहे.
राज ठाकरेंच्या या ट्विटवर ओमकार शिराळकर नामक एका व्यक्तीने कमेंट केली आहे. “राजसाहेब दर सहा-आठ महिन्यांनी भूमिका बदलतात. ते पाहता उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील. तीच एक भूमिका घेणे आता बाकी राहिले आहे,” असे त्यांनी आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार का अशा चर्चा रंगल्या आहेत.
तसेच एका व्यक्तीने संदीप देशपांडे, गजानन काळे आणि शालिनीताई ठाकरे या लोकांना आवरा, असा सल्लाही दिला आहे. तर एकाने रात्री ‘गुड मॉर्निंग साहेब’ अशी खोचक कमेंट केली आहे. याचवेळी काही लोकांनी राज ठाकरेंच्या ट्विटला समर्थनही दिले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या लढाईतील अनेक मुद्द्यांवर मनसे नेते संदीप देशपांडे प्रतिक्रिया येत असतात. मात्र, आता राज ठाकरे यांनी या सगळ्या प्रकरणावर मनसैनिकांनी काहीच न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : धनुष्यबाण गोठल्यावर शिवसेनेला डिवचणाऱ्या मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी जाहीर झापले; म्हणाले…
raj thackeray : दसरा मेळाव्याच्या दिवशी राज ठाकरे मुंबईबाहेरून सूत्र हलवणार; जाणून घ्या मनसेचा खास प्लॅन
Raj thackeray : जेव्हा जेव्हा अशी कीड तयार होईल तेव्हा; अमित शाहांना टॅग करत राज ठाकरेंची प्रतिक्रिया
raj thackeray : मनसेत फुट पडू नये म्हणून राज ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल; घेतला हा निर्णय, वाचा सविस्तर