राज ठाकरेंनी सांगितला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढायचा मार्ग…

मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशात केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर सविस्तर भाष्य केले आहे. यावेळी राज यांनी मोदी सरकारवर निशाणा देखील साधला आहे. तसेच याबाबत बोलताना राज यांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा मार्ग देखील सुचवला आहे.

ते म्हणतात, “कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा”, असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणतात, ‘शेतकरी आंदोलन आंदोलन चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करुन केंद्राने या गोष्टींचा निर्णय घ्यायला हवा होता. हे प्रकरण इतकं चिघळण्याची आवश्यकता नव्हती.’

दरम्यान, “शेतकरी आज इतक्या थंडीत तिथं आंदोलन करतोय. आणखी किती दिवस हे प्रकरण चिघळवणार. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्र बसावं आणि प्रश्न सोडवावा”, अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपला धक्का! ‘या’ बड्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
‘कोण कुठली रिहाना? का तिला इतकं महत्व दिलं जातय?’
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा…; राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.