“पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही”

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली असून, यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

ते म्हणतात, ‘नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असले तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतेय ते पाहणारच आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. ते म्हणतात, “माझे पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्लांचं नाव आलं आहे, ”

‘उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असे या प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच मुल्लांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असे राज म्हणाले.

दरम्यान, ‘या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार आहे. नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी शरद पवारांची भेट घेणार आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

चिमूरडी म्हणतेय मी आयुष्यभर सोनू सूदचा फोटो डिपीला ठेवनार आहे; कारण वाचून धक्का बसेल

कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंशी राज ठाकरे काय बोलले? स्वत: राज ठाकरेंनीच केलं जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.