‘कोण कुठली रिहाना? का तिला इतकं महत्व दिलं जातय?’

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया येत आहेत. अलीकडेच पॉप स्टार रिहानाने आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. त्यानंतर अनेक जागतिक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

याचाच धागा पकडत दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन सुरू असलेल्या ट्विटर वॉरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला त्या रिहानावरही जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही”, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ‘कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा,’ असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा…; राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम
मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा; वाचून तुम्हाला वाटेल कौतुक
शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला; “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.