मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंध तसेच वीकेंड लॉकडाऊन लावण्याआधी विरोधी पक्षांना विश्वासात घेतले होते. आणि त्यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात संवादाचा नवा पूल बांधला गेला आहे.
रविवारी फोनवरून तर सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात संवाद झाला. जवळपास २० मिनिटं ही चर्चा झाली. यावेळी राज यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे हेदेखील उपस्थित होते.
या संवादाचा एक फोटो मनसेने ट्वीट केला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली, असे ट्वीटमधून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. #लढाकोरोनाशी #BreakTheChain pic.twitter.com/9E2Dn0f6lU
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 5, 2021
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या परिस्थितीमुळे लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना रविवारी फोन करून म्हटले आहे.
त्यावर मनसेनेही सकारात्मक प्रसिसाद दिला. आपण सर्वांनी सरकारी सूचनांचे पालन करावे, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनसेने केले.
महत्त्वाच्या बातम्या
१०० कोटी वसुलीचे आरोप अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती, रिलायन्सशी भागीदारी; जाणून घ्या..
सट्टेबाजीत ३० लाखांचं नुकसान झाल्यानंतर तारक मेहतामधील ‘हा’ बडा अभिनेता बनला चोर
‘चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?’
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.