राज ठाकरेंचा वीज बिलाच्या प्रश्नावर गौप्यस्फोट; ‘शरद पवारांकडे अदानी येऊन गेले अन् सरकारने…’

मुंबई | वीज कंपन्यांकडून लॉकडाउनच्या काळात नागरिकांना जास्तीची वीज बिल देण्यात आली होती. वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसेने राज्यभरात आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारनेही वीज बिल माफीची घोषणा केली होती.

परंतु, नंतर पुन्हा वीज बिल माफी देणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे यांनी आज नवी मुंबईत बेलापूर न्यायालयात हजेरी लावली.

त्यानंतर ठाण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्य सरकारमधील मंत्री आधी वीजबिल माफ करू म्हटले. पण अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, असे जाहीर केले. हे सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे.’

तसेच यावेळी बोलताना राज्यपालांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांशी वीजबिलाच्या मुद्द्यावर बोलणं झाल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. “शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएमईबी असेल किंवा टाटा असेला या सर्वांशी शरद पवार बोलणार होते.

मात्र ५-६ दिवसांनी मला कळालं की गौतम अदानी शरद पवारांची भेट घेऊन आले. त्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ होणार नाही, असं जाहीर केलं. त्यामुळे याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे”, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
सचिनकडून भारतरत्न सन्मानाचा अपमान; पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडून टिका
रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’
‘ठाकरे सरकारला देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.