Share

Raj Thackeray : मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो; राजकीय वर्तुळात खळबळ – नेमकं घडतंय काय?

Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला जोरदार विरोध सुरू आहे.

शिवसेना (Shivsena – Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलै रोजी गिरगाव (Girgaon) येथे राज ठाकरे एक मोठा मोर्चा काढणार आहेत.

मनसेच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे नेते अजित पवार यांचा फोटो

या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदी सक्तीविरोधात घेतलेली राज ठाकरेंची आक्रमक भूमिका आहे. त्यामुळे या मोर्चात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राजकारणात एक नवी आणि लक्षवेधी घडामोड समोर आली आहे. मनसेच्या (MNS) एका बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे (Nationalist Congress Party – Ajit Pawar faction) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो झळकलेला आहे.

या बॅनरवरून मनसेने थेट अजित पवार यांना मोर्चात सहभागी होण्याचं सार्वजनिक आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे, या बॅनरवर अजित पवार यांनी हिंदी सक्तीकरणाविरोधात दिलेली प्रतिक्रिया छापण्यात आली आहे. बॅनर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी लावले आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया अशी आहे –

“इयत्ता पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं. कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझं लादणं योग्य नाही.” हीच प्रतिक्रिया मनसेने बॅनरवर छापून, आपला हिंदीविरोधी आंदोलनात अजित पवारही आमच्या सोबत आहेत, असा संदेश दिला आहे. यावर आता अजित पवार यांची अधिकृत भूमिका काय असेल? ते प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होतील का? याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – Sharad Pawar faction) ने देखील मनसेच्या मोर्चाला समर्थन दिलं आहे. यासोबतच त्या पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी देखील अजित पवार आणि त्यांच्या गटाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. एकूणच, मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणाऱ्या नेत्यांच्या भूमिका, पक्षांतराचे संभाव्य संकेत, आणि राजकीय समीकरणं यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नव्या वळणावर येण्याची चिन्हं दिसत आहेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now