उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय का, त्यांच्यावर राज्य आलंय; राज ठाकरेंचा टोला

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. यावेळी, राज ठाकरेंनी एका विनोदातून मुख्यमंत्र्यांना चिमटाही काढला.

मला काल एक विनोद आला होता, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’ असा मजेशीर टोलाही राज यांनी लगावला.

तसेच यावेळी बोलताना दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना केल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. “काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत, असे ते म्हणाले.

त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

‘माझ्या वडिलांना सोडा’, नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद

प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; नव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.