सलमान खानच्या ‘शेरा’ला तर सगळेच ओळखतात पण या व्हिडीओनंतर फेमस झाला राज कुंद्राचा बॉडीगार्ड

शिल्पा शेट्टी कुंद्राचा पती राज कुंद्रा याला नुकताच न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला राज कुंद्रा बराच काळ तुरुंगात होता, पण अलीकडेच जेव्हा हा बिझनेसमन कोर्टातून जामिनावर सुटला, तेव्हा तो जवळजवळ दोन महिन्यांनी त्याच्या कुटुंबीयांना भेटला.

यानंतर, पती-पत्नी आणि पिता-पुत्राचे प्रेम सगळ्यांना पाहायला मिळाले. पण त्याचबरोबर त्याच्या अंगरक्षकही चर्चेचा विषय ठरलेला आहे. आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेल्या या अंगरक्षकाची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.

हिरोप्रमाणे पळताना दिसून आला
जेव्हा राज कुंद्रा काळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये त्याच्या जुहू बंगल्यावर पोहोचला तेव्हा शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्राचा अंगरक्षक रवी हिरोप्रमाणे त्याच्या कारसमोर धावताना दिसला. राज कुंद्राच्या संरक्षणाखाली रवी सतत अस्वस्थ होत होता आणि इकडे -तिकडे धावत होता आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इंटरनेवर चर्चेचा विषय बनलाय रवि
आपल्या कामावर आणि मालकावर निष्ठा दाखवत या अंगरक्षकाने अनेकांचे मन जिंकले आहे. कामाप्रती त्याचे समर्पण पाहून लोक सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा शिल्पा शेट्टीचे वडील मरण पावले तेव्हा रवी संपूर्ण वेळ सुनंदा शेट्टींसोबत उभा राहिला होता.

निष्ठेचे उदाहरण
हा व्हिडिओ पापाराझी व्हायरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कमेंट सेक्शनमधील लोक त्याला निष्ठेचे उदाहरण म्हणत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, अशी निष्ठा मिळवणे कठीण आहे, ती जपून ठेवली पाहिजे.

त्याचप्रमाणे दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, हा व्हिडिओ खरोखरच भावनिक आहे. तो त्याच्या कामाला किती आदर देतो हे या व्हिडीओतून सिद्ध होते. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड शेअर होत आहे. अनेकांना त्याची तुलना सलमान खानचा अंगरक्षक शेराशी केली आहे.

महत्वाच्या  बातम्या
महिला अत्याचारांचे सर्वात जास्त प्रकरण भाजपशासित राज्यांमध्येच; काँग्रेसने आकडेवारी सादर करत भाजपचे केले तोंड बंद
दिल्लीतील मुलाने केला पोलंडमधील पुरूषाशी समलैंगिक विवाह, वाचा त्यांची अजब गजब प्रेमकहाणी
काय सांगता! चिकनपेक्षा मेथी महाग, भाज्यांचे दर शंभरीपार, शेतकरी सुखावला
मुलं जन्माला घालण्यात मुस्लिम एक नंबरवर; अहवालातून धक्कादायक खुलासे आले बाहेर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.