नर्गिसच्या आठवणींमध्ये वेडे झाले होते राज कपूर; दिवस रात्र प्यायचे दारु

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुनील दत्तचे नाव मोठ्या गर्वाने घेतले जाते. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये एक दोन दशक नाही तर चार दशक राज्य केले. २५ मे २००५ ला सुनील दत्त हे जग सोडून गेले. पण त्यांचा अभिनय आणि चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करुन आहे.

सुनील दत्तची कहाणी त्यांच्या पत्नी नर्गिसशिवाय पुर्णच होऊ शकत नाही. सुनील दत्तच्या आयूष्यातील प्रत्येक वळणावर नर्गिस त्यांच्यासोबत होत्या. बॉलीवूडमधील काही अजरामर प्रेम कहाण्यांमध्ये या दोघांच्या प्रेम कहाणीचा समावेश होतो.

मदर इंडिया चित्रपटाच्या सेटवर सुरु झालेली ही लव्ह स्टोरी लग्नापर्यंत जाऊन पोहोचली. नर्गिस सुनीलच्या प्रेमात अशा पागल झाल्या की, त्यांनी धर्माची सीमा मोडत सुनील दत्तसोबत लग्न केले. शेवटच्या क्षणापर्यंत दोघे होते. पण या दोघांची अमर प्रेम कहाणी एका व्यक्तिशिवाय पुर्ण होऊ शकत नाही.

ही व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नसून शो मॅन राज कपूर आहेत. सर्वांनाच माहीती आहे की, नर्गिसच्या आयूष्यात सुनील दत्त येण्याअगोदर त्या राज कपूरच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. अनेक वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते. सगळ्या इंडस्ट्रीला त्यांच्या नात्याबद्दल माहीती होते.

अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर राज कपूर आणि नर्गिस एकमेकांच्या प्रेमात पागल झाले होते. एक दोन वर्ष नाही तर नऊ वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. बॉलीवूडमध्ये सगळीकडे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. पण एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या नर्गिस आणि राज कपूरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता.

दोघे लग्न करतील असे बोलले जात होते. पण या लग्नात एक अडचण होती. ती म्हणजे राज कपूरचे अगोदरपासूनच विवाहीत असणे. राज कपूरचे लग्न कृष्णासोबत झाले होते. त्यांना पाच मुलं झाली होती. तरीही राज कपूरने नर्गिसला लग्नाचे वचन दिले होते.

राज कपूर मात्र नर्गिससोबत लग्न करणे टाळत होते. या गोष्टीला वैतागून नर्गिसने राज कपूरपासून दुर जाण्याचा निर्णय घेतला. तिने आर के बॅनर सोडून दुसरीकडे काम करायला सुरुवात केली. त्यांनी ‘मदर इंडिया’ चित्रपट साईन केला. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट सुनील दत्तसोबत झाली.

राज कूपरमूळे दुखी झालेल्या नर्गिसला सुनील दत्तकडे प्रेम मिळाले. दोघांचे प्रेम एवढ्या लवकर पुढे गेले की, दोघांनी एका वर्षाच्या आतच लग्न केले. नर्गिस आणि सुनील दत्तच्या लग्नाच्या बातम्यांनी इंडस्ट्रीला धक्का बसला होता. सर्वांना शॉक लागला होता.

तर दुसरीकडे राज कपूर नर्गिसच्या आठवणींमध्ये वेडे झाले होते. नर्गिस सोडून गेल्यामूळे राज कपूरला खुप मोठा धक्का बसला होता. त्यांनी दिवसभर रात्रभर दारु प्यायला सुरुवात केली होती. नर्गिसच्या आठवणींमध्ये राज कपूर अनेक दिवस दारुच्या नशेत धुंद झाले होते. पण काही दिवसांनी मात्र त्यांनी नर्गिसला बेवफा सांगितले.

महत्वाच्या बातम्या –
शाहरुख खानने जेव्हा प्रियांका चोप्राला लग्नासाठी मागणी घातली होती, तेव्हा तिने दिले होते हे उत्तर
दिशा वाकानी अर्थात जुन्या दयाबेनला विसरून जातील सगळे! शोमध्ये येणार नवीन चेहरा, सोबत अनेक ट्वीस्ट
बॉलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, जाणून घ्या कारण..
…म्हणून सावत्र बहीणींच्या लग्नाला गेले नव्हते सनी आणि बॉबी देओल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.