राज कपूरला जमिनीवर झोपणे पडले महागात; भरावा लागला होता मोठा दंड

अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांकडे पैशांची कमी नसते. हे यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षे मेहनत करावी लागते. त्यामुळे पैसे आल्यानंतर कलाकारांमध्ये खुप बदल होतात. पण काही कलाकार मात्र कधीच त्यांच्या सीमा विसरत नाहीत. कितीही यश मिळाले तरी त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात.

बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर देखील अशाच कलाकारांपैकी एक आहेत. एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारे राज कपूर स्वभावाने खुप साधे भोळे होते. त्यांना स्टारडमचे बिलकुल घमंड नव्हते. त्यांच्या या स्वभावाचे खुप कौतुक करण्यात यायचे.

पण कधी कधी मात्र त्यांना त्यांच्या साध्या स्वभावामूळे खुप नुकसान व्हायचे. पण त्यांना मात्र काहीही फरक पडत नव्हता. त्यांच्यासाठी त्यांचा स्वभाव खुप महत्त्वाचा होता. राज कपूरचे असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया त्यातलाच एक किस्सा. जो आजही खुप प्रसिद्ध आहे.

राज कपूर मोठ्या पद्यावर कितीही मोठे स्टार असले तरी त्यांना साध्या पद्धतीने राहणे खुप आवडायचे. जमिनीवर बसून जेवण करणे आणि जमिनीवर झोपणे त्यांना खुप आवडायचे. याच स्वभावामूळे राज कपूरला मोठे नुकसान झाले होते.

एका फिल्म फेस्टिव्हलसाठी राज कपूर लंडनला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांची राहण्याची सोय लंडनमधील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये केले होती. ‘हिल्टन’ असे त्या हॉटेलचे नाव होते. मोठे हॉटेल असल्यामुळे तिथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या.

राज कपूर दिवसभर फेस्टिव्हलला जायचे आणि रात्री उशिरा हॉटेलवर यायचे. हॉटेलवर आल्यानंतर राज कपूर रुममध्ये जेवण मागवायचे आणि खाली जमिनीवर बसून जेवायचे. झोपताना ते बेडवरील गाधी खाली टाकायचे आणि जमिनीवर झोपायचे.

जमिनीवर झोपणे हे हॉटेलवाल्यांना मान्य नव्हते. त्यांच्या नियमावलीमध्ये या गोष्टीची परवानगी नव्हती. त्यामुळे ज्यावेळी हॉटेलच्या स्टाफने राज कपूरला जमिनीवर झोपलेले पाहिले त्यांनी ही गोष्ट जाऊन मॅनेजरला सांगितली.

हॉटेलच्या मॅनेजरने सुरुवातीला राज कपूर असे करू नका सांगितले आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला. जमिनीवर झोपणं गुन्हा आहे ही गोष्ट समजताच राजला धक्का बसला. त्यांनी हॉटेलचा दंड भरला. पण दुसऱ्या दिवशी परत ते जमिनीवर झोपले.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील त्यांना दंड भरावा लागला होता. चार पाच दिवस ही गोष्ट सुरू होती. पण राज कपूर मात्र सुधरले नाही. शेवटी राज कपूरने आठवड्यांचा दंड भरला आणि ते जमिनीवर झोपू लागले. यावरून समजते की, राज कपूर स्टार असले तरी खुप साधे होते.

महत्वाच्या बातम्या –
अभिषेक बच्चनने सांगितले खरे कारण, ‘या’कारणामुळे त्याने कधी ऐश्वर्यासोबत किसिंग सीन नाही दिला
लाडकी दयाबेन दिशा वकानी पुन्हा एकदा दिसणार तारक मेहतामध्ये; पहा गरब्याचा स्पेशल व्हिडीओ
विराट कोहलीने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलेच नव्हते, अशी जमली होती लव्हस्टोरी
अभिनेते ज्युनियर मेहमूदने राजेश खन्नाबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले ते तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.