बॉलीवूडच्या पार्टीमध्ये जाताना स्वत:ची खास दारु सोबत घेऊन जायचे शो मॅन राज कपूर

फिल्म इंडस्ट्रीमध्ये खाण्या पिण्याबद्दल बोलले जाते त्यावेळी कपूर कुटूंबाचे सर्वात पहीले येते. पाहूणचार आणि खाण्या पिण्याच्या बाबतीत कपूर कुटूंब नेहमीच पुढे असते. या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ति पाहूण्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या इच्छा पुर्ण करतात.

कपूर कुटूंबातील सर्वात मोठे सदस्य आणि सुपरस्टार राज कपूरचे नाव या यादीत सर्वात पहीले येते. राज कपूर इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी नेहमीच पार्टीचे नियोजन करायचे. पण त्या पार्टीमध्ये एक गोष्ट खुप वेगळी असायची. ती म्हणजे राज कपूर आणि पार्टीमध्ये आलेल्या कलाकारांची दारु वेगळी असायची.

हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण ही गोष्ट खरी आहे. रा कपूरला ड्रिंक करायला खुप जास्त आवडत होते. विशेष म्हणजे राज कपूर एका वेगळ्या ब्रॅंडची दारु प्यायचे. त्यांच्यासाठी ही दारु लंडनवरुन मागवली जायची. अतिशय महाग असणारी ही दारु त्यांच्यासाठी खुप महत्वाची होती.

राज कपूरला दारु प्यायची असेल तेव्हा ते याच ब्रॅंडची दारु प्यायचे. नाही तर दारु पित नव्हते. बॉलीवूडच्या पार्टीमध्ये जायचे असेल तर राज कपूर त्यांच्या दारु सोबत घेऊन जायचे. ते पार्टीत असणारी दारु कधीच पित नव्हते. त्यामूळे त्यांचा रुबाब खुप वेगळा होता.

राज कपूरला सर्वाच्या या सवयीबद्दल सगळ्या इंडस्ट्रीला माहीती होते. राज कपूर इंडस्ट्रीतील काही मोजक्या कलाकारांना त्यांच्या ब्रॅंडची दारु द्यायचे. या यादीत अभिनेत्री तनूजाचे नाव देखील येते. राज कपूर दारुबद्दल खुपच गंभीर होते.

राज कपूर इंडस्ट्रीतील मित्रांसोबत नाही तर घरातील सदस्यांना देखील त्यांची दारु देत नव्हते. त्यांच्या मुलासाठी भारतातील दारु असायची. पण त्यांच्यासाठी खास लंडनवरुन दारु मागवली जायची आणि ही गोष्ट त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होती. शेवटच्या दिवसांमध्ये देखील राज कपूर बाहेरुन दारु मागवत होते.

बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर देखील अशाच कलाकारांपैकी एक आहेत. एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारे राज कपूर स्वभावाने खुप साधे भोळे होते. त्यांना स्टारडमचे बिलकुल घमंड नव्हते. त्यांच्या या स्वभावाचे खुप कौतुक करण्यात यायचे.

पण कधी कधी मात्र त्यांना त्यांच्या साध्या स्वभावामूळे खुप नुकसान व्हायचे. पण त्यांना मात्र काहीही फरक पडत नव्हता. त्यांच्यासाठी त्यांचा स्वभाव खुप महत्त्वाचा होता. राज कपूरचे असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या –
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल
‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले, ‘आम्ही छोटे होतो म्हणून कलाकार गदर चित्रपटाला द्यायचे नकार
..म्हणून मेहमूदने सगळ्यांसमोर मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली होती
संजय दत्तच्या या गर्लफ्रेंडला वैतागले होते सुनील दत्त; ब्रेकअप करण्याचे दिले आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.