स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल

राज बब्बर बॉलीवूडमधील सर्वात दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत. राज बब्बरने त्यांच्या अभिनयाने खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं होत. १९७२ मध्ये राज बब्बर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अब्राहम अलका यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले.

एन एस डीमध्ये राज बब्बर यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना तिथेच नोकरी करण्याची संधी देण्यात आली होती. पण राज बब्बर यांना मात्र चित्रपटांची ओढ लागली होती. त्यामूळे त्यांनी ती ऑफर स्वीकार केली नाही.

नोकरी करण्याऐवजी राज बब्बरने बॉलीवूडमध्ये काम करणे पसंत केले होते. अनेक सुपरहिट चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनय करुन त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. अभिनयासोबतच अनेकदा राज त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे चर्चेत असायचे.

राज बब्बर यांनी हिंदीसोबतच पंजाबी चित्रपटांमध्ये काल केले आहे. त्यांचे काम वाढत होते. त्यांना चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. याच काळात त्यांची आणि स्मिता पाटील यांची ओळख झाली. या दोघांनी एकत्र ११ चित्रपटांमध्ये काम केले.

या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. या दोघांनी १९८६ मध्ये लग्न केले. राज आणि स्मिता यांची ‘भीगी पलके’ या चित्रपटाच्या सेटवर पहीली भेट झाली होती. राज बब्बर पहीलेपासून विवाहीत होते.

त्यांना दोन मुले देखील होते. त्यामूळे या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.बॉलीवूडमध्ये स्मिता पाटीलला होम ब्रेकर बोलले जात होते. पण त्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राज बब्बर यांनी नादीरा यांना सोडले आणि स्मिता पाटीलसोबत लग्न केले. या दोघांच्या लग्नाने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. कारण प्रेमासाठी राज बब्बरने त्यांच्या पत्नीला सोडले होते. त्यावेळी या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांना प्रतिक हा मुलगा झाला. प्रतिकच्या जन्मानंतर पंधरा दिवसांनी स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. त्यावेळी राजला खुप मोठा धक्का बसला होता. त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.

स्मिता पाटीलच्या निधनानंतर राज बब्बर अभिनेत्री रेखाच्या जवळ आले होते. त्याकाळात रेखा देखील अमिताभ बच्चनपासून दुर जाण्याच्या दुखात होती. दोघांच्या दुखांनी त्यांना एकत्र आणले होते.

इंडस्ट्रीमध्ये राज आणि रेखाच्या अफेअरची चर्चा सुरु झाली होती. आयूष्यात आलेल्या अडचणींना दोघांना जवळ आणले. पण एकदा रेखाच्या एका चाहत्याने राजला रेखापासून दुर राहण्यास सांगितले. रेखापासून दुर राहा नाही तर जीव गमव अशी धमकी दिली होती.

या धमकीनंतर राज घाबरले. त्यांनी रेखापासून दुर राहण्याचा निर्णय घेतला. रेखाला त्यांच्या या निर्णयाने मोठा धक्का बसला होता. ब्रेकअपच्या काही दिवस अगोदर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. हे भांडण मुंबईच्या रस्त्यांवर झाले होते.

त्यावेळी या भांडणाची खुप जास्त चर्चा झाली होती. चिडलेल्या रेखाने रस्त्यावरच राज बब्बरसोबत ब्रेकअप केले होते. ती गोष्ट वर्तमान पत्रांची हेडलाईन बनली होती. पण नेहमीप्रमाणे रेखाचे हे अफेअर देखील जास्त काळ टिकू शकले नाही.

महत्वाच्या बातम्या –
..म्हणून मेहमूदने सगळ्यांसमोर मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली होती
‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले, ‘आम्ही छोटे होतो म्हणून कलाकार गदर चित्रपटाला द्यायचे नकार
करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी वडील सलीन खानचे एक स्वप्न अजूनही पुर्ण शकला नाही सलमान खान
संजय दत्तच्या या गर्लफ्रेंडला वैतागले होते सुनील दत्त; ब्रेकअप करण्याचे दिले आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.