सिनेमा सुद्धा फिका पडेल इतकी नाट्यमय लव्हस्टोरी आहे स्मिता पाटील व राज बब्बरची

बॉलीवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण करणे खुप कठीण असते. जेव्हा एखादा कलाकार बाहेरुन येऊन या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तेव्हा त्या कलाकारचा प्रवास अवघड असतो. पण काही कलाकार सगळ्या अडचणी पार करून बॉलीवूडचे स्टार बनतात.

असेच एक अभिनेते म्हणजे राज बब्बर. सध्या राज बब्बर हे बॉलीवूडसोबतच राजकारणातील देखील खुप मोठे नाव आहे. त्यांनी अभिनयासोबतच राजकारणात पण चांगले काम केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

राज बब्बर यांचा जन्म २३ जुन १९५२ ला उत्तराप्रदेशमध्ये झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथून पुर्ण केले. लहान असतानाच त्यांनी अभिनेता बनायचे हे ठरवले होते. त्यांनी शाळेत असताना अनेक नाटके केली.

त्यानंतर त्यांनी पटीयाला युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. पटीयाला युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी नाटक विभागात प्रवेश घेतला. इथे त्यांची भेट हरपाल तिमाना यांच्याशी भेट झाली. ते ‘पजांब कला मंच’ नावाची संस्था चालवत होते. त्यात राज बब्बर यांनी सहभाग घेतला.

हरपाल तिमाना यांनी राज बब्बर यांना सांगितले की, ‘राज तु नाटक चागले करत आहेस. पण चित्रपटांमध्ये जाण्यासाठी तुला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घ्यावा लागेल.’ राज बब्बर यांनी हरपाल यांचा हा सल्ला ऐकला.

१९७२ मध्ये राज बब्बर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अब्राहम अलका यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले.
एन एस डीमध्ये राज बब्बर यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना तिथेच नोकरी करण्याची संधी देण्यात आली होती.

पण राज बब्बर यांना मात्र चित्रपटांची ओढ लागली होती. त्यामूळे त्यांनी ती ऑफर स्वीकार केली नाही.
राज बब्बरला सरुवातीला दारा सिंगचे चित्रपटे आवडत होते. नंतर मात्र त्यांना दिलीप कुमारच्या अभिनयाने प्रभावित केले.

चित्रपटांच्या अगोदर राज बब्बर दूरदर्शनसाठी काम करत होते. तसेच त्यांनी नाटके देखील सुरु ठेवली होती .राज बब्बर यांना नाटकासाठी ५० रुपये भेटत होते. तर ५ रुपये हे रिहलसलसाठी भेटत होते. ही त्यावेळेसची सर्वात चांगली रक्कम होती.

राज बब्बर यांनी अभिनेत्री नादीरा जहीर यांच्याशी लग्न केले. नादीरा सज्जाद जहीर यांची मुलगी आहे. राज बब्बर यांचे वैयक्तीक आयुष्य चांगले सुरु होते. पण अजून त्यांना चित्रपटामध्ये यश मिळाले नव्हते.
त्यामुळे राज बब्बर यांनी नाटके सुरूच ठेवली होती.

याच काळात राज बब्बर यांची त्या काळातील प्रसिद्ध फिल्ममेकर प्रकाश मेहरासोबत ओळख झाली. या दोघांची मैत्री वाढत गेली. ‘शारदा’ हा राज बब्बरचा पहीला चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत जीतेंद्र आणि रामेश्वरी मुख्य भुमिकेत होते.

राज यांची भुमिका या चित्रपटात खुप छोटी होती. पण त्यांचा अभिनय दमदार होता. या चित्रपटासाठी त्यांना ५०० रुपये मिळाले होते. या चित्रपटानंतर त्यांना एका चित्रपटाची ऑफऱ आली.

हा चित्रपट होता ‘इंसाफ का तराजू’ हा चित्रपट सुपरहीट ठरला. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भुमिका निभावली होती. त्यांच्या अभिनयाची खुप प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

राज बब्बरने निकाह, असर प्यार का, जिद्दी, याराना, अंदाज, बरसात, दलाल, साजिश, दाग द फायर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली. त्यांनी त्यांच्या प्रभावशाली अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

राज बब्बर यांनी हिंदीसोबतच पंजाबी चित्रपटांमध्ये काल केले आहे. त्यांचे काम वाढत होते. त्यांना चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. याच काळात त्यांची आणि स्मिता पाटील यांची ओळख झाली. या दोघांनी एकत्र ११ चित्रपटांमध्ये काम केले.

या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. या दोघांनी १९८६ मध्ये लग्न केले. राज आणि स्मिता यांची ‘भीगी पलके’ या चित्रपटाच्या सेटवर पहीली भेट झाली होती.
राज बब्बर हे पहीलेपासून विवाहीत होते.

त्यांना दोन मुले देखील होते. त्यामूळे या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.बॉलीवूडमध्ये स्मिता पाटीलला होम ब्रेकर बोलले जात होते. पण त्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राज बब्बर यांनी नादीरा यांना सोडले आणि स्मिता पाटीलसोबत लग्न केले. या दोघांच्या लग्नाने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. कारण प्रेमासाठी राज बब्बरने त्यांच्या पत्नीला सोडले होते. त्यावेळी या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांना प्रतिक हा मुलगा झाला. प्रतिकच्या जन्मानंतर पंधरा दिवसांनी स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. त्यावेळी राजला खुप मोठा धक्का बसला होता. त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.

अशा काळात राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना सांभाळले. स्मिताच्या मृत्यूनंतर राज त्यांच्या परीवाराकडे परत गेले. त्यांच्या कुटुंबाने स्मिता पाटीलच्या मुलाचा सांभाळ केला.

अनेक वर्षे राज बब्बर चित्रपटांपासून लांब होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला. त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. राज बब्बर यांनी टेलिव्हिजन, चित्रपट आणि राजकारण या तिन्हीमध्ये देखील काम केले.

राज यांनी स्वत: चे ‘बब्बर फिल्मस प्रायवेट लिमीटेड’ प्रोडक्शन हाऊस सुरु केले. त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राज बब्बर यांनी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. तर हा होती राज बब्बर यांचा चित्रपटांमधील प्रवास.

महत्त्वाच्या बातम्या –

अलका कुबलच्या मुलींचे फोटो पाहून थक्क व्हाल; सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना देतात टक्कर

घटस्फोटाच्या आदल्या रात्री मलायकासोबत ह्या धक्कादायक गोष्टी घडल्या होत्या

त्या दिवशी करण जोहरने मीडियासमोर गोविंदाची जाहीर माफी मागितली होती; असं काय घडलं होतं?

एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.