Share

Hardik Pandya : हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, फक्त गोलंदाजीने नाही तर बॅटनेही करतो कहर

Hardik Pandya (

Hardik Pandya : BCCI ने पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 विश्वचषक 2022 साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचाही समावेश करण्यात आला आहे. या विश्वचषकात पंड्या भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

मात्र, हार्दिकची फिटनेस ही त्याच्या करिअरची सर्वात मोठी समस्या ठरली आहे. बर्‍याच काळानंतर पंड्याने IPL 2022 पासून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली आहे. पण त्याची फिटनेस लक्षात घेऊन बीसीसीआय 19 वर्षीय स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूला बॅकअप म्हणून ठेवू शकते. ज्याने आपल्या वेगवान गोलंदाजीसोबतच आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत.

भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 22 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. ज्याचे आयोजन भारताने केले आहे. त्याचबरोबर या मालिकेत टीम इंडियाची कमान संजू सॅमसनच्या हाती असणार आहे. एवढेच नाही तर 19 वर्षीय स्टार अष्टपैलू राज अंगद बावालाही संघात संधी देण्यात आली आहे.

आयपीएल 2022 मध्ये देखील पंजाब किंग्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते आणि त्याला पदार्पण करण्याची संधी देखील दिली होती. राज हा तोच खेळाडू आहे ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

पण भविष्यात काही अनुचित प्रकार घडले तर आता बीसीसीआय राज अंगदला हार्दिक पांड्याचा बॅकअप म्हणून वापरण्याचा प्रयत्न करू शकते. कारण राज हा हार्दिक पांड्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करण्यासाठी देखील ओळखला जातो.

राज अंगद बावाने ICC अंडर 19 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपल्या धारदार गोलंदाजी आणि मारक फलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. राजने विश्वचषकातील 6 सामन्यात 4.50 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत 9 विकेट घेतल्या.

याशिवाय त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, राजने 63 च्या सरासरीने आणि 100.80 च्या चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 252 धावा केल्या. ज्यामध्ये तुफानी शतकाचाही समावेश होता. त्याचवेळी विश्वचषक स्पर्धेत नाबाद 162 धावांची त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

महत्वाच्या बातम्या
aditya thackeray : १२ आमदार सुरतला गेले तेव्हा उद्धवजी मला म्हणाले, त्यांच्यामागे पोलिस लावून…; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा
Team India : भारताची साडेसाती जाईना, वर्ल्डकप सोडून मायदेशी परतला ‘हा’ वेगवान गोलंदाज, रोहित टेंशनमध्ये
Navneet Rana : आताची सर्वात मोठी बातमी! कोणत्याही क्षणी खासदार नवनीत राणांना होऊ शकते अटक

मनोरंजन इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now