नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारले, प्रकल्पग्रस्तांची घेतली भेट

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये. नाणार प्रकल्पात मुलीमुलींना रोजगार मिळेल. त्यामूळे हा प्रकल्प गमावणे महाराष्ट्राला आणि कोकणाला परवडण्यासारखे नाही. अशी ठोस भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी “राज ठाकरेंच्यात हिंमत असेल तर नाणार वासियांसमोर भूमिका मांडावी” असं आव्हान दिलं होतं.

राज ठाकरे यांनी राऊत यांच्या आव्हानाला स्वीकारले असून नाणार प्रकल्पग्रस्तांची काल ( दि.०८) निवास्थानी  भेट घेतली आहे. यावेळी मोठया संख्येने नाणारवासीय उपस्थित होते. राज ठाकरेंनी त्यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून नाणार प्रकल्पाबाबत समर्थन करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्याच्या मागणीचे शरद पवार आणि फडणवीस यांनी समर्थन केले आहे. त्यांची भूमिका योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते विनायक राऊत

नाणारमध्ये २२१ भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का?. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी नाणार वासियांसमोर भूमिका मांडावी. असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा आदेश पाळायचा नसेल”- रामदास आठवले
फडणवीस म्हणतात, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दहा रूपयांनी महाग
वेटर म्हणाला डोळे दुखतात, अन् तात्याराव लहानेंनी हॉटेलमध्येचं केली उपचाराला सुरूवात

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.