काय सांगता? तलावात पडला २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा पाऊस, वाचा नेमकं काय घडलं..

अजमेर । कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेक नागरिक बेरोजगार झालेले आहेत. मात्र, अजमेर येथे एक अशी घटना घडली आहे, की जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य चकित वाटेल. राजस्थान अजमेर येथील आनासागर तलावात कोणीतरी नोटांनी भरलेली बॅग फेकली होती.

रविवारी संध्याकाळी अचानक याठिकाणी २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा पाण्यावर तरंगताना दिसत होत्या. ही माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी या तलावानजीक गर्दी केली. इतकेच नाही, तर लोकांनी तलावाच्या पाण्यात उड्या मारून नोटा जमा करण्यास सुरूवातही केली. स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळताच घटनास्थळी अधिकाऱ्यांनी धाव घेतली.

तेव्हा महापालिकेचे कर्मचारीही बोट घेऊन तलावात उतरले आणि नोटा जमा करू लागले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. लोकांनी तलावाच्या ठिकाणी गर्दी केली असता पोलीस पथक येथे आले आणि त्यांनी लोकांना तिथून हटवले.

२०० आणि ५०० रुपयांच्या नोटा तलावात पडलेल्याच्या प्रकारावर स्थानिक मोहम्मद उस्मान यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी काही नोटा तरंगताना दिसत होत्या. त्यानंतर काही लोक तलावाच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी नोटा जमा करण्यास सुरूवात केली. मला स्वत:ला यावेळी जवळपास २५०० रुपये मिळाले.

तर इतरांनाही हजारो रुपये मिळाले होते. जेव्हा ही बातमी शहरात पसरली तेव्हा अनेकांनी तलावाजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली. काही विचार न करता लोकांनी तलावात उड्या मारायला सुरुवात केली.

आनासागर तलावात २०० आणि ५०० च्या नव्या नोटा आढळल्या. पोलिसांच्या अंदाजानुसार कोणत्या तरी व्यक्तीचे पाकीट तलावात पडले असावे, त्यातील नोटा बाहेर आल्या असतील. पंरतु काही लोक तलावात नोटांनी भरलेल्या बॅगा फेकल्याचे सांगत होते.

ताज्या बातम्या

इंडिअन आयडल १२ वर भडकले गायक अभिजित भट्टाचार्य, अनु मलिक यांनीही दिली साथ; अशा शब्दांत झापले..

मोठी ऑफर! १४ हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय ६९९ रुपयांना, जाणून घ्या…

रोज करा ‘हा’ घरघुती सोप्पा उपाय; गुप्तरोग बरा होतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.