महाराष्ट्रात कोसळणार धो धो पाऊस; या जिल्ह्यात पावसाचा हवामान विभागाने दिला अंदाज

राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट वाढत आहे आणि दुसरीकडे पावसाने पण काही ठिकाणी चांगलाच जोर धरला आहे. कोरोना संकट काळात पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्याभरापासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. पावसामुळे मुंबई आणि ठाण्यात उन्हाचा प्रभाव वाढला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी आणि कुडाळ या भागांमध्ये पण चांगला पाऊस झाला.

सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यासोबतच अनेक ठिकाणी पण पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अवकाळी आलेल्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने पण राज्यात काही ठिकाणी गारपीटीसह चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. नांदेड, हिंगोली आणि लातूर येथे पण पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

विदर्भ आणि केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी बाहेर पडताना वातावरण बघून बाहेर पडावे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील काही भागात अजून काही दिवस पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह माध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.