पाऊस कधी, किती पडणार? अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या..

शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. असे असताना आता परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे. त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

ते शेतकऱ्यांना मोठी मदत करतात, शेतकऱ्यांना हवामानाबद्दलची अचूक माहिती देण्याचे काम हवामान अभ्यासक पंजाब डख करत आहेत. पंजाबराव डख हे शेतकरी कुटुंबातील असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती आहे. या आधी देखील त्यांनी अचूक अंदाज सांगितला आहे.

वडिलांसोबत ते हवामानाबद्दल अनेक चर्चासत्रे आणि बातम्या पाहत असत. त्यांच्या म्हणण्यानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणार होता आणि यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल असे देखील त्यांनी सांगितले होते.

त्यांचा आतापर्यंतचा अंदाज बरोबर आहे. यापुढे ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस पडणार आहे. यावर्षी त्यांनी महाराष्ट्रभर पडणाऱ्या पावसाबद्दल एक विशेष अंदाज वर्तवला होता आणि आतापर्यंत महाराष्ट्रात झालेला हा पाऊस त्यांचा अंदाज हा खरोखर अत्यंत बरोबर आहे हेच सांगतो आहे.

यामुळे शेतकऱ्यांना देखील त्यांच्यावर विश्वास आहे, मार्च महिन्याच्या तिसऱ्या महिन्यात त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या पावसाबद्दल अंदाज वर्तवला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.