रेल्वे रुळावर चिमुकला तोल जाऊन पडला; रेल्वे कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत वाचवले प्राण, पाहा व्हिडिओ

बदलापुर | सोशल मिडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक काळजाचा थरकाप उडवणार व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बदलापुरमधील वांगणी रेल्वे स्थानकावर एका रेल्वे कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत एका चिमुकल्याचा जीव वाचवला आहे.

रेल्वे विभागात पॉईंटमन म्हणून काम करणाऱ्या मयुर शेळके यांनी या मुलाचे प्राण वाचवले आहेत. रेल्वे स्थानकावर एक महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन रेल्व ट्रॅकच्या कडेने चालली होती. तेवढ्यात मुलगा रेल्वे रुळावर पडतो. महिलेला डोळ्यांनी दिसत नव्हते. मुलाला वाचवण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडत होती.

मुलगा सुध्दा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. तेवढ्यात भरधाव वेगात रेल्वे आली. त्या ठिकाणी  कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी मयुर शेळके यांना मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला असल्याचं दिसलं आणि त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी जोरात धाव घेतली आणि त्या मुलाचा जीव वाचवला आहे.

सोशल मिडियावर मयुर यांच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत मयुर शेळके यांच्या धाडसाला सलाम असं म्हटलं आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही पॉईंटमन मयुर शेळके यांचं कौतूक केलं आहे. मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकातील मयुर शेळकेचा अभिमान वाटतो. त्याने हिंमत दाखवत एका मुलाचे प्राण वाचवले आहेत. त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल असं गोयल यांनी म्हटलं आहे.

मयुर शेळकेंना पुरस्कार देऊन सन्मान करा

आमचं हातावरच पोट असल्यानं काम करणं जरुरी असतं. त्यासाठीच मी प्लॅटफॉर्मवर चालत होते, मात्र चालता-चालता माझा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला, त्यावेळी त्याला बाहेर काढायला कुणीही नव्हतं.

तितक्यात एक्सप्रेस गाडी आली होती. पण झेंडेवाल्या मयूर शेळकेनं स्वत:चा जीव धोक्यात घालून आमच्या मुलाचा जीव वाचवला. माझा एकमेव आधार मयूरमुळेच जिवंत राहिला. त्यामुळे, मयूरला पुरस्कार द्यावा, अशी मागणी चिमुकल्याची अंध माता संगिता शिरसाठ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सरकारचा सर्वात मोठा निर्णय! १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर होणार कारवाई.? आव्हाडांनी दिला काळ्याबाजाराचा पुरावा
‘इंजेक्शन नको मला दारू पाहिजे’; सोशल मिडीयावर महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.