रेल्वेप्रवास करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी! आता व्हाट्स अँपवर समजनार रेल्वे कुठवर आलीय

मुंबई | रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना आता रेल्वेच्या प्रत्येक गोष्टीची माहिती व्हाट्स अँपवर मिळणार आहे. ट्रेनच्या PNR स्टेटससह ट्रेन लाईव्ह स्टेटस, ट्रेन उशिरा असल्यास त्याच्या माहितीसाठी एक नवीन फिचर आलं आहे.

त्यासाठी तुम्हाला railofy नावाचे अँप डाउनलोड करावे लागेल. या अँपच्या मदतीने तुम्ही व्हाट्स अँपवर सगळी माहिती मिळवू शकता. मुंबई बेस्ट स्टार्टअपने हे अँप बनवले आहे. यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

जर तुम्हाला PNR स्टेटसची माहिती पाहिजे असेल तर फक्त ९१ ९८८११९३३२२ या नंबरवर १० अंकी PNR नंबर पाठवावा लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीला रेग्युलर रेल्वेचे PNR स्टेटसची माहिती मिळेल.

तसेच ट्रेनचे तिकीट कन्फर्म आहे की वेटिंगला आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. यासोबतच ट्रेन लवकर येणार आहे उशिरा येणार आहे याचीही माहिती दिली जाईल. जर तुम्ही ट्रेनमध्ये असाल तर पुढील स्टेशन कोणते मागील स्टेशन कोणते गेले याचीही माहिती मिळेल.

दर महिन्याला ६० लाखांपेक्षा जास्त लोक रेल्वेची माहिती गुगलवर सर्च करतात. लोक गुगलवर जास्त अवलंबून आहेत. पण तिथे योग्य माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे railofy ही सर्व माहिती व्हाट्स अँपच्या माध्यमातून प्रवाशांना देण्याचा प्रयत्न करत आहे.

या अँपच्या मदतीने तिकिटांची किंमत किती तसेच त्यांची तुलनाही करता येणार आहे. तसेच कोणत्या रेल्वेमध्ये प्रवासाला किती वेळ लागेल याचीही माहिती मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

विराट कोहलीच्या आईने नकार दिला नसता तर आज ‘ही’ हॉट मुलगी त्याची पत्नी असती

वडापाव विकता विकता हा माणूस कसा बनला आमदार; एकदा वाचाच…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.