डॉक्टर नव्हे सैतान! तपासणीसाठी आलेल्या विवाहित महिलेवर डॉक्टरने दवाखान्यातच केला बलात्कार

रायगड | राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कठोर निर्बंध लावत आहे. कोरोना रुग्णांचे अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.

पोलिस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अधिकारी आपल्या कुटूंबाची, जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र रायगडमधील एका नराधम डॉक्टरने अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. त्याच्या कृत्याने एकच खळबळ माजली आहे.

रायगडमधील श्रीवर्धन शहरात प्रवीण बंदरकर नावाच्या डॉक्टरचं प्रवीण क्लिनिक आहे. १९ एप्रिल रोजी विवाहित महिला छातीत दुखत असल्याने बंदरकरच्या दवाखान्यात गेली होती. तपासणीच्या नावाखाली  डॉक्टर घाणेरडे कृत्य करत असल्याचं महिलेला जाणवलं.

महिलेने याबाबत विचारलं असता डॉक्टरने तपासत असल्याचं सांगितलं. त्यानंतर महिलेसोबत कोणी नसल्याचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर जबरदस्तीने बंदरकरने दवाखान्यातच बलात्कार केला आहे.

यानंतर महिलेने पतीला हा संपुर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरिक्षक गावडे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाग्रस्त पत्नीला बेड मिळण्यासाठी जवानाची वणवण भटकंती, म्हणाला, मी देशासाठी मरतोय आणि..
कोरोनाच्या संकटात रतन टाटा आले मदतीला धावून; परदेशातून आयात करणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर
शेतकऱ्याची झाली चांदी! दीड एकरात केली द्राक्षांची लागवड, आता मिळतेय तीन लाखांचे उत्पन्न

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.