IND vs AUS: 17 मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या मालिकेत तीन एकदिवसीय सामने आयोजित करण्यात आले होते. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर भारताने विजयाने मालिकेची सुरुवात केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कांगारूंचा संघ 35.4 षटकांत 188 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाने केएल राहुलच्या झुंजलेल्या अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्सने रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले.
कांगारूंचा संघ फलंदाजीत पुर्णपणे फ्लॉप ठरला. पण केएल राहुलच्या शहाणपणाने टीम इंडियाची लाज वाचवली. त्यानेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 35.4 षटकांत 188 धावांवर गारद झाला.
एकवेळ 2 बाद 128 धावांवर फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघाने अवघ्या 59 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर मिचेल मार्श बाद झाल्याने संघाच्या पडझडीला सुरुवात झाली. मोठी खेळी खेळणारा मिचेल मार्श एकमेव फलंदाज होता. त्याच्या बॅटने संघासाठी 65 चेंडूत 81 धावा केल्या.
त्यांच्याशिवाय स्टीव्ह स्मिथने 22, मार्नस लबुशेनने 15 धावा, जोश इंग्लिशने 26 आणि कॅमेरून ग्रीनने 12 धावा केल्या. हे फलंदाज वगळता एकाही खेळाडूला 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. भारताकडून सिराज आणि शमीने सर्वाधिक बळी घेतले, त्यांनी प्रत्येकी तीन खेळाडूंची शिकार केली. शमीने इंग्लिश, ग्रीन आणि स्टोनिश (5) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
तर हेड (5), अॅबॉट (0) आणि अॅडम झम्पा (0) यांच्या विकेट सिराजच्या नावावर होत्या. मार्श आणि मॅक्सवेल (8) यांनाही बाद करून जडेजाने दोन यश मिळवले. हार्दिकने स्मिथ आणि कुलदीपने लबुशेन यांची विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. 19.2 षटकात अवघ्या 83 धावा करून निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.
इशान किशन 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि विराट कोहलीने 4 धावा केल्या. शुभमन गिलला केवळ 20 धावा करता आल्या. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने खाते न उघडता विकेट गमावली. हार्दिक पांड्याने 25 धावांची नोंद केली. अशा परिस्थितीत केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या जोडीने डाव सांभाळला आणि संघाला विजय मिळवून दिला.
या दोघांमध्ये 106 धावांची जबरदस्त भागीदारी झाली. त्यापैकी 41 धावा जडेजाने तर 75 धावा राहुलच्या बॅटने केल्या. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्कने तीन आणि मार्कस स्टॉइनिसने दोन विकेट घेतल्या.
महत्वाच्या बातम्या
‘शिंदे गटात गेलेले सगळे परत येतील, पण ‘या’ व्यक्तीला पुन्हा कधीच शिवसेनेत घेणार नाही’
सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार? कायदेतज्ञ म्हणतात, ..तर ठाकरे गटाचेच आमदार अपात्र होतील
सत्तासंघर्षाची सुप्रीम सुनावणी संपली, कोर्ट काय निकाल देणार? उज्वल निकम म्हणाले, माझ्या मते..