आशिकी फेम अभिनेते राहुल रॉय यांना शूटिंग सुरू असतानाच ब्रेन स्ट्रोकचा झटका

मुंबई | १९९० मधील आशिकी चित्रपटाततून सगळ्यांची मने जिंकणारे अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. ते कारगिलमध्ये एका चित्रपटाची शूटिंग करत होते. परंतु शुटिंगदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना ताबडतोब मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना दोन दिवस आधीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराला ते रिस्पॉन्ड करत आहेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

त्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. बऱ्याच काळानंतर त्यांनी चित्रपटात पदार्पण केले होते पण अचानकपणे त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांचे सर्व चाहते ते बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

राहुल रॉय यांनी आशिकी या चित्रपटातून चित्रपटात पदार्पण केले होते. आजही तो चित्रपट हिट आहे आणि त्यातील गाणीही हिट आहेत. आशिकी नंतर त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांनी ४७ चित्रपट साइन केले होते.

आशिकीनंतर त्यांचे चित्रपट चालले नाहीत त्यामुळे ते लाईमलाईटपासून दूर गेले. त्यानंतर बिग बॉस सीझन १ मध्ये आले व त्यांनी पहिला सिझन जिंकला त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर पुन्हा ते गायब झाले पण आता ते पुन्हा इतक्या वर्षानंतर ते चित्रपट LAC- Live the Battle मध्ये दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! गर्भवती महिला टॉयलेटला गेली आणि गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं

जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? खुद्द पाटलांकडून खुलासा, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.