‘…तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वात मोठा विश्वासघात ठरेल’

मुंबई | हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ‘शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने लादलेले काळे कृषी कायदे रद्द झाले नाहीत आणि त्यापेक्षा इतर काही गोष्टींवर तडजोड झाली तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वात मोठा विश्वासघात ठरेल,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार…
यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असे सांगितले गेले. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे.’

मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. यानंतर बुधवारी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, ‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळेल; AIIMS च्या संचालकांची माहिती
‘मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की काय?’
डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? घ्या जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.