‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध’

मुंबई | हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असे सांगितले गेले. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. यानंतर बुधवारी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, ‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य…
केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला संतापून कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे,’ असे कटारिया यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
#coronavirus : कोरोनापासून बचावासाठी ‘हा’ नियम पाळावाच लागणार; घ्या जाणून
संजय राऊत यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा, म्हणाले…
“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.