गेले काही दिवस केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी चलो दिल्ली आंदोलन सूरू केले आहे. यावर विरोधी पक्षाने भाजपवर टिका केली आहे. आता मोदींनी जवान आणि किसान यांना एकमेकांविरोधात उभं केलं असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
राहुल यांनी ट्विट केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत एक जवान एका म्हातार्या शेतकर्यावर लाठीचार्ज करताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करत राहुल गांधींनी, आपल्या देशाचा नारा हा जय जवान आणि जय किसान असा आहे. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारामुळे जवान शेतकर्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत, असे म्हटले आहे.
बड़ी ही दुखद फ़ोटो है। हमारा नारा तो ‘जय जवान जय किसान’ का था लेकिन आज PM मोदी के अहंकार ने जवान को किसान के ख़िलाफ़ खड़ा कर दिया।
यह बहुत ख़तरनाक है। pic.twitter.com/1pArTEECsU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 28, 2020
केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाला देशभर अनेक ठिकाणी जोराचा विरोध होतो आहे. सरकारने शेतकर्यांविरोधात खोट्या केसेस दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगताना खोट्या एफआयआरमुळे शेतकर्यांचं धैर्य खचणार नाही हे लक्षात असू द्या. अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा अपराध नाही तर कर्तव्य आहे. असे राहुल गांधी म्हणाले.
‘तुम्ही जर ओवेसींना मत दिले तर ते मत भारतविरोधी असणार’
“संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा आल्यामुळे ते जास्त फडफड करत आहेत”