३५ वर्षांपूर्वी माझ्या घरातील पंतप्रधान, मग घराणेशाही कुठेय? राहुल गांधींचा भाजपाला सवाल

मुंबई | भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर घराणेशाहीचे आरोप केले होते. यावर बोलताना आता राहुल गांधी यांनीही भाजपला खडा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत शिकागो विद्यापीठाचे प्रोफेसर दीपेश चक्रवर्ती यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर ‘स्वप्ने विकणारे पंतप्रधान’ असा आरोप केला.

ते पुढे बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या घरातील व्यक्ती ३५ वर्षांपूर्वी पंतप्रधान होती, त्यानंतर कोणीही या पदावर बसले नाही. युपीए सरकार असताना गांधी घराण्यातील कोणीही सरकारमध्ये नव्हते. मग माझ्यावर घराणेशाहीचा आरोप कसा करता? ’असा खडा सवाल राहुल गांधी यांनी भाजपला विचारला आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘३५ वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनले. मी सध्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे तर मूल्यांची लढाई लढतोय. मी राजीव गांधींचा मुलगा आहे, तर मी मूल्यांची लढाई का लढू शकत नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. यावर बोलताना राहुल गांधी म्हणतात, ‘शेतकरी आंदोलनाबाबत ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ उद्योगपतींची भर करण्यासाठी नवे कृषी कायदे आणले आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या
‘१०० हून जास्त खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत’
संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘पडळकरांना आता आम्ही सोडणार नाही…’
मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील मैदानात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.