राहूल गांधींचा राईट हॅंड असलेला महाराष्ट्रातील काॅंग्रेसचा झुंझार नेता काळाच्या पडद्याआड

पुणे: कॉंग्रेसचे मोठे नेते खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. पण अखेर राजीव सातव ही लढाई हारले आहेत. पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४६ वर्षांचे होते.

राजीव सातव हे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे बडे नेते होते. दिल्लीत कॉंग्रेस पक्षात त्यांचे चांगलेच वजन होते. राहूल गांधी यांच्या ते खूप जवळचे होते. राहूल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये त्यांचा समावेश होतो.

आमचं सगळ्यात मोठं नुकसान झालं अशा शब्दांत राहूल गांधींनी दुख: व्यक्त केले. माझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वाईट वाटते. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल कळवळा आणि प्रेम आहे. असं ट्विट राहूल गांधी यांनी केले आहे

त्यांच्या आई रजनी सातव या माजी खासदार होत्या. त्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. तसेच गांधी घराण्याच्या अतिशय विश्वासातील होत्या. सोनिया गांधींशी त्यांची मैत्री होती. अशा हुरहुन्नरी नेत्याच्या निधनाने महाराष्ट्राचे व कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.

२२ एप्रीलला कोरोना पॉझीटिव्ह झाल्यानंतर ते पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये ते ॲडमीट होते. कालच त्यांच्या प्रकृतीविषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याच आरोग्यमंत्र्यांनी सांगीतले होते.

आज आरोग्यमंत्री राजेश टोपे राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जहांगीर हॉस्पीटलला भेट देणार होते पण तत्पूर्वीत सातव यांचे निधन झाले. कोरोनातून ते बरे झाले होते पण त्यांना न्युमोनियाची लाइन झाली होती. त्यामुळे त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यातच त्यांचे निधन झाले.

२०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातील संपूर्ण कॉंग्रेस भूईसपाट झाली होती. फक्त दोनच मतदारसंघात कॉंग्रेसचे खासदार निवडूण आले होते. त्यात राजीव सातव होते. हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराचा पहील्याच फटक्यात पराभव करत ते खासदार झाले होते.

त्यानंतर २०१९ ची निवडणूक त्यांनी लढवली नाही. देशभरातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार बनले होते. गुजरातमधील २०१७ च्या विधानसभा निवडणूकीचे ते प्रभारी होते. कॉंग्रेसला मिळालेल्या यशात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

महत्वाच्या बातम्या
नागपुरात भोंदुबाबाचा पर्दाफाश; नागीण डान्स करून कोरोना रुग्णांवर करत होता उपचार
भारताकडून काहीतरी शिका, पाकिस्तानवर नाराजी व्यक्त करत, पाकिस्तानी खेळाडूने सोडला देश
गंगेत वाहणारे मृतदेह भारताचे नाहीत तर नायजेरियाचे; पंगा क्विन कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.