“राहूल गांधींनी ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी”

 

 

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहूल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारावर निशाणा साधला होता. राहूल गांधींनी सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरुन मोदी सरकारवर टीका केली होती.

आता राहूल गांधींच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. राहूल गांधींनी लग्न करुन हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी आज (शनिवार) पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी राहूल गांधींना लग्न करुन घेण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच रामदास आठवले यांनी शेतकरी आंदोलनावर ते बोलले आहे. सरकार चर्चेला तयार आहे, पण कायदेच मागे घ्या ही शेतकऱ्यांची मागणी असंवैधानिक आहे. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला वाढवत आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसनेही जाहीरनाम्यात शेतकरी कायद्याचे वचन दिले होते, याची आठवण करुन देत रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.