‘मोदीजी चीनला आपल्या प्रदेशातून कधी हाकलणार त्याची पण तारीख देशाला सांगा’

मुंबई |  पंतप्रधान नरेद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता देशवासीयांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. पंतप्रधान नेमकं कशाबद्दल बोलतील याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

याचाच धागा पकडत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘आज रात्री ६  पंतप्रधान मोदी काय बोलतील, याविषयी बोलण्याची क्षमता नाहीये. पण पंतप्रधान मोदी चीनी सैनिकांविषयी काय बोलतील? हे ऐकायला मला आवडेल, असे ते म्हणाले.

याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे. पुढे याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘पंतप्रधान मोदीजी आज तुम्ही तुमच्या भाषणात चीनला आपल्या प्रदेशातून बाहेर फेकण्याची तारीख देशाला सांगायला हवी,’ असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान मोदी त्याबद्दल काय बोलतील का? की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; ७/१२ च्या नावात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती करायची सोपी पद्धत
फडणवीसांची कोंबड्यासारखीच अवस्था झालीये; राष्ट्रवादीची फडणवीसांवर बोचरी टिका
हेमामालिनीशी लग्न करायला परवानगी देताना धर्मेंद्रच्या पत्नीने टाकली होती ‘ही’ विचीत्र अट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.