Share

Rahul Gandhi : इंदिरा गांधींच्या 50 टक्के मोदींमध्ये दम असेल, तर संसदेत थेट सांगावं, ट्रम्प खोटारडे, खोटं बोलत आहेत; मोदींवर राहुल गांधींची थेट घणाघात

Rahul Gandhi  : लोकसभेत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) विषयावर सुरू असलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाषण केले, मात्र या भाषणात चीन (China) आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दाव्यांचा थेट उल्लेख टाळला. यामुळे विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाषणापूर्वीच आव्हान दिलं होतं की, “इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) 50 टक्के दम असेल, तर मोदींनी संसदेत उभं राहून सांगाव ट्रम्प खोटं बोलत आहेत.” मात्र मोदींनी भाषणात ना ट्रम्पचा थेट उल्लेख केला, ना चीनचं नाव घेतलं. त्यांनी एवढंच सांगितलं की, युद्धबंदीबाबत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता आणि कुणाशीही चर्चा झाली नव्हती.

सरकार चीनच्या भूमिकेबद्दल मौन का बाळगते?

राहुल गांधी यांनी संसदेतून बाहेर पडल्यावर पत्रकार परिषदेत म्हटलं “चीनने पाकिस्तानला (Pakistan) मदत केली हे सर्वांना माहीत आहे, पण मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी त्यांच्या भाषणात चीनचा एकदाही उल्लेख केला नाही. सरकार चीनच्या भूमिकेबाबत बोलण्याचं टाळत आहे.”

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही भाजपवर (BJP) प्रहार केला. ते म्हणाले “भाजपला शब्दांनी हरवणं शक्य नाही. पाकिस्तान भारताची बाजारपेठ हिसकावतोय, सीमांवर अतिक्रमण करतोय, तरी सरकार निष्क्रिय आहे. 2014 पासून भारताची सीमा वाढली की कमी झाली, हे तरी सांगा. आपण स्वावलंबनाबद्दल बोलतो, पण प्रत्यक्षात व्यापारावर अवलंबून झालो आहोत.”

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील “ठोक दो” धोरणाचा संदर्भ देत म्हटलं की, “संसदेत चर्चेऐवजी धमकीचं राजकारण चालतंय का? जर दहशतवादी पुन्हा भारतात येत असतील, तर गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरत आहे. सरकारकडे याची जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर नाही.”

विरोधकांना मिळाली नाही थेट उत्तरं

समाजवादी पक्षाचे संभळ (Sambhal) येथील खासदार झिया-उर-रहमान बर्क (Zia-ur-Rehman Barq) म्हणाले  “ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली, पण आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत.”

तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) म्हणाले “मोदींच्या भाषणात काही नवीन नव्हतं. 26 जवान का मरण पावले, याचं उत्तर दिलं नाही. ट्रम्प श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते, पण मोदींनी त्यांना खोटं का ठरवलं नाही?”

काँग्रेस खासदारांचाही आरोप 

काँग्रेस खासदार किरण कुमार (Kiran Kumar) यांनी मोदींवर टीका करत म्हटलं “11 वर्षांच्या सत्तेनंतरही मोदी अजून भूतकाळावरच भाषण देतात. आजच्या विशेष अधिवेशनात त्यांनी अंतर्गत सुरक्षेतील अपयश, ट्रम्प हस्तक्षेप, किंवा चीनचा उल्लेख केला नाही.”

काँग्रेसचे केसी वेणुगोपाल (KC Venugopal) म्हणाले  “ट्रम्प यांचा दावा खोटा आहे की नाही, हे विचारलं तर मोदी उत्तर देत नाहीत. ते ट्रम्पचा उल्लेख करण्यास घाबरतात आणि पाकिस्तानच्या कथेमागे लपतात.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now