कोरोनाच्या संकटात देश कोण चांगलं सांभाळू शकतं नरेंद्र मोदी कि राहूल गांधी ? जनता म्हणाली…

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांवर ताण आला असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे मोदी सरकारवर सतत टिका केली जात आहे. काँग्रेस नेते राहूल गांधींपण मोदी सरकारवर वारंवार टिका करत आहे. मोदी सरकारला कोरोनाची स्थिती सांभाळता येत नाही, असा आरोप राहूल गांधी करत आहे. असे असले तरी कोरोनाची स्थिती राहूल गांधींपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगली सांभाळत असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पुर्ण झाली आहे. आता नरेंद्र मोदी यांच्या कामा संदर्भात एबीपी माझा या खाजगी वृत्तवाहिनीने एक सर्वे केला आहे. ज्या सर्वेमध्ये नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबद्दल आणि कोरोना संकटात नरेंद्र मोदी परिस्थीती हाताळण्याबाबत होते.

याच सर्वेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणजे कोरोनाची परिस्थीती कोण चांगल्याप्रकारे सांभाळू शकतं नरेंद्र मोदी की राहूल गांधी? या प्रश्नावर मोदी कोरोनाची परिस्थिती योग्यप्रकारे सांभाळू शकतात, असे या सर्ववरुन समोर आले आहे.

सर्वेमध्ये ६६ टक्के शहरी आणि ६२ टक्के ग्रामीण भागातील लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. तर २० टक्के शहरी आणि २३ टक्के ग्रामीण भागातील लोकांनी राहूल गांधींवर विश्वास दाखवला आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतावरील कोरोनाचे संकट वाढत आहे. असा आरोप राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर टिका केली होती. तसेच आता लसीकरणाची गती कमी झाली आहे, असेही राहूल गांधी यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

“मोदीजी १५ लाखांसाठी ७ वर्षापासून वाट पाहतोय, तुम्ही ३० मिनीटे वाट पाहू शकत नाही”
चार वर्ष वेगळे राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची झाली होती ‘अशी’ अवस्था
पत्नीने पतीला रंगे हात पकडले, दुसऱ्या महिलेसोबत एका रूममध्ये होता बंद, मग..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.