अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी केली जोरदार टीका, ‘देशाची संपत्ती गरिबांच्या हातात नसून…’

मुंबई | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर अर्थसंकल्पावर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. सत्ताधारी नेते मंडळींकडून या अर्थसंकल्पाचे कौतुक केले जात आहे. तर, विरोधी पक्षांनी यावर टीका करणे सुरू केले आहे.

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीकास्त्र सोडले आहे. ‘गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ‘हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती.

मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल त्यांनी यांनी केला. दरम्यान, या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. याचबरोबर मोदी सरकारवर देखील तिखट शब्दात निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘गरिबाला आणखी गरीब करु नका, महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्या’
सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय…
महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.