राहुल गांधी भाजपवर बरसले! कोरोना योद्धांना मारहाण प्रकरण

कोरोना योद्ध्यांवर झालेल्या मारहाणीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भोपाळमध्ये आपल्या मागण्यांसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली.

या मारहाणीचा विडिओ राहुल गांधी यांनी ट्विट करून मध्य प्रदेश सरकारवर आणि मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले आपल्या हक्कासाठी कोरोना योद्धा लढत आहेत. देशात कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान केला जात आहे.

सरकारने कंत्राटी पद्धतीने काम न करता पुढे या कर्मचाऱ्यांना कायम कामावर घेण्यासाठी हे आंदोलन मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. अगोदर सरकारने आम्हाला कोरोना योद्धा म्हटले मग आताच काय झाले असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आता सरकार त्यांना मारहाण करत आहे. हे फार लाजिरवाणी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपल्या हक्काच्या नोकरीसाठी हे कोरोना योद्धा काम करत असतात मात्र त्याच्यावर अशी मारहाण केली जाते हे फार चुकीचे आहे. अन्यायकारक भाजपा सरकारच्या प्रशासकीय सत्तेचे घृणास्पद प्रदर्शन, असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. सध्या देशात कृषी कायद्या विरोधात देखील आंदोलन सुरू आहे. दिल्लीत जोरदार राजकीय वातावरण पेटले आहे. यावरून देखील राहुल गांधी मोदींवर आक्रमकपणे टीका करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.