ऑक्सीजनअभावी आणि ICU बेड न मिळाल्याने होणारे मृत्यू हे केंद्र सरकारचे पाप- राहूल गांधींचा थेट आरोप

दिल्ली । देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाही, तर रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मिळत नाहीत. मृत्यूची देखील संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.

यामुळे केंद्र सरकारवर विरोधक टीका करत आहेत, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आता मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ऑक्सीजनअभावी आणि ICU बेड न मिळाल्याने होणारे मृत्यू हे केंद्र सरकारचे पाप आहे, असा थेट आरोप राहूल गांधींनी केला आहे.

ते म्हणाले, कोरोना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी करु शकतो. पण देशातील ऑक्सिजन आणि बेड्सच्या कमतरेतेमुळे अनेक मृत्यू होत आहेत. यासाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोना परिस्थिती हाताळन्यावरून राहुल गांधी यांनी अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी कोरोनामुळे पश्चिम बंगालमधील सर्व प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी याठिकाणी मोठ्या सभा घेतल्या, यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांमध्ये सध्या निवडणूक होत आहे.

ताज्या बातम्या

कोरोनावर औषध शोधणाऱ्या बाबा रामदेव यांच्याच संस्थेत कोरोनाचा शिरकाव, ८३ जणांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! विरारच्या कोरोना रुग्णालयात भीषण आग; १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु

ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाचे सीईओ ढसाढसा रडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.