Share

मी त्याचा खुप आदर करतो पण.., रिद्धिमान साहाच्या गंभीर आरोंपावर राहुल द्रविडची पहिली प्रतिक्रिया

rahul-vridhiman.j

श्रीलंकेविरुद्धच्या(Shrilanka) कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर खेळाडू रिद्धिमान साहाने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(Rahul Dravid) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल द्रविड यांनी मला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले होते, असा खुलासा रिद्धिमान साहाने केला होता.(rahul dravid satement on vridhiman saha allegation)

रिद्धिमान साहाच्या(Ridhimaan Saha) या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक(Coach) राहुल द्रविड यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामना जिंकल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, “रिद्धिमान साहाचे भारतीय क्रिकेटमधील योगदान मोलाचे आहे. मी त्याचा खूप आदर करतो. परंतु निवृत्तीबाबतची गोष्ट त्याने दुसऱ्याकडून ऐकावी असे मला वाटत नव्हते. मला वाटत होतं की पूर्ण सत्य त्याने माझ्याकडून ऐकावे”, असे राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुढे म्हणाले की, “मी केलेल्या प्रत्येक वक्तव्याशी तो सहमत असेलच असे नाही, तशी माझी अपेक्षा देखील नाही. आता देखील जेव्हा आम्ही प्लेइंग इलेव्हन निवडतो तेव्हा आम्ही त्या खेळाडूंशी चर्चा करतो. ज्या खेळाडूंची निवड झाली नाही त्या खेळाडूंना नैराश्य येणे सामान्य आहे.”

“भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील खेळाडूंशी चर्चा करतो. एखाद्या खेळाडूला भारतीय संघात खेळवायचे नसल्यास तसे तो स्पष्ट करतो. आम्ही एखाद्या खेळाडूला भारतीय संघात का स्थान देतो किंवा का स्थान देत नाही या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी देखील आम्ही तयार असतो”, असे राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर साहाने आपली प्रतिक्रिया देताना राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, साहाशिवाय अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या :-
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण: दोषींची शिक्षा कमी करण्यासाठी हायकोर्टात जाणार मौलाना मदनी, म्हणाले..
ना लग्न, ना सात फेरे, अशा पद्धतीने झाले फरहान-शिबानीचं लग्न; वाचा कोणती आहे ही अनोखी पद्धत
VIDEO: लालू प्रसाद यादव यांना शिक्षा होताच ढसाढसा रडला नेता, म्हणाला लालू प्रसाद हे गरिबांचे ‘मसीहा’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now