Share

राहुल द्रविडचे पुस्तकाच्या दुकानातील फोटो व्हायरल, साधेपणा पाहून चाहते म्हणाले…

भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि द वॉल ऑफ टीम इंडिया अशी ओळख असलेले राहुल द्रविड यांचे नाव समोर येताच त्यांच्या साधेपणाची आठवण होते. राहुल द्रविड हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्थिर खेळाडूंपैकी एक आहे. राहुल द्रविडला क्रिकेटच्या मैदानावर ओरडताना, चिडताना आणि रागावताना कुणी पाहिलं नसेल.(rahul dravid photo viral  social media)

राहुल द्रविड नेहमीच शांत खेळाडू राहिला आहे. मैदानाबाहेरही द्रविड सामान्य माणसाप्रमाणे जगतो. सध्या राहुल द्रविडचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राहुल द्रविड एका पुस्तकाच्या(Book) दुकानात बसलेला दिसत आहे. पण पुस्तकाच्या दुकानात राहुल द्रविडला कोणीही ओळखू शकले नाही.

त्याचा साधेपणा साधेपणा पाहून लोक कौतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड माजी खेळाडू गुनप्पा विश्वनाथ यांच्या ‘रेस्ट अ‍ॅश्युअर्ड’ पुस्तकावर चर्चा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहूल द्रविड मास्क घालून कार्यक्रमस्थळी पोहोचला आणि शांतपणे मागे बसला.

यावेळी पुस्तकाच्या दुकानात उपस्थित असलेल्या लोकांना राहुल द्रविड मागे बसल्याचे माहित नव्हते. ही बाब लोकांना कळताच काही लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. दुकानात उपस्थित असलेल्या लोकांनी राहुल द्रविडसोबत फोटो काढले आणि त्याचा ऑटोग्राफ देखील घेतला. द्रविडच्या साधेपणाचे युजर्सनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “या कार्यक्रमात राहुल द्रविड एकटा मास्क घालून बसला होता. मी आणि माझ्या मित्र त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना नमस्कार केला. तसेच त्यांचा ऑटोग्राफ देखील घेतला. या कार्यक्रमावेळी राहुल द्रविड शेवटच्या रांगेत बसले होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलीला देखील राहुल द्रविड शेजारी बसले आहेत याची कल्पना नव्हती.”

राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविड यापूर्वी १९ वर्षांखालील भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तसेच भारतीय ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देखील राहुल द्रविडने काही काळ सांभाळली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ब्रेकअपनंतर जेव्हा रेखा पार्टीत भेटली, तेव्हा सर्वात आधी अमिताने केलं होतं हे काम. चाहतेही हैराण
ज्यांना घरातून बाहेर काढलय त्यांच्यावर काय बोलणार? तुमची लायकी नाही…
माला सिन्हाने खरंच शर्मिला टागोरला कानाखाली मारली होती का? जाणून घ्या खरं सत्य

ताज्या बातम्या इतर खेळ

Join WhatsApp

Join Now